या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20 हजार रुपये अनुदान मिळणार!

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या माध्यमातून खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनीधारणेनुसार प्रति हेक्टर रु. 20,000/- प्रमाणे (दोन हेक्टरचा मर्यादेत) प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय काढून मान्यता दिलेली आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येणार आहे-

  • वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम 2024-25 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहे.
  • खरीप पणन हंगाम 2024-25 साठी धान/ भरडधान्य खरेदीबाबतील शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची काळजी घ्यावी.
  • किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पिक पाहणी,ई- भूमी, महानोंदणी, पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतलेल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या 7/12 उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंध शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे.
  • शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर रु. 20,000/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाचे थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.
  • धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थाकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असायला हव्यात.
  • प्रोत्साहनपर अनुदानास पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही.
  • शेतकऱ्याने सादर केलेल्या 7/12 उताऱ्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात यावी. तसेच यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा वापर करावा.
  • एखादा शेतकरी जर दोन्ही अभिकर्ता संस्थाकडे नोंदणीकृत असल्यास, त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्याला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *