महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही कायमच चर्चेत असते. या योजनेतंर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. परंतु फेब्रुवारी महिना संपला तरी अजून देखील महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार का? यामुळे लाखो महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. यावर आता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः समोर येऊन माहिती दिलेली आहे व महिलांचा संभ्रम दूर केलेला आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती.
दोन्ही महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार?-
ही योजना यशस्वीरित्या चालू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार सक्षम आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?-
आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 5 किंवा 6 मार्चसापासून जमा होण्यास सुरुवात होणार व 7 मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.
मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार?-
मार्च महिन्याचे पैसे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जमा करण्यात येणार आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.