ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून महाऊर्जाकडे अर्ज भरले होते. परंतु त्यांचे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांना अर्जासाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. पीएम कुसुम घटक योजनेच्या माध्यमातून ज्या अर्जांना मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु अशा अर्जांचे अजूनही पेमेंट झालेले नव्हते, अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे. जर या शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत पैसे भरले नाहीत, तर त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. या अशा शेतकऱ्यांना मेडाकडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात आलेला आहे.
यामध्ये असे लिहिलेले आहे की प्रिय पुढे त्या लाभार्थी व्यक्तीचे नाव कुसुम योजनेच्यातंर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास या अगोदर वारंवार सांगण्यात आले परंतु आपणाकडून लाभार्थ्याता अप्राप्त आहे. लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी आपणास अंतिम 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. आपण मुदतीमध्ये लाभार्थी हिस्सा न भरल्यास आपल्याला लाभार्थ्या हिस्सा भरण्याचा पर्याय बंद करून आपला अर्ज अपूर्ण आहे असे समजून पुढील लाभार्थ्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार आहे, असे मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया शुल्क भरणा कसा करावा याबद्दलची माहिती.
असा करावा शुल्क भरणा-
- सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जाऊन मेडा बेनिफिशियरी हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर हे ॲप इंस्टॉल करावे व आपण मेडाकडे दिलेल्या मोबाईल नंबरच्या साह्याने लॉगिन करावे.
- आता पुढे अर्ज तपशील या पर्यावर क्लिक करायचा आहे. यामध्ये लाभार्थ्यांचा तपशील दिसून येणार आहे.
- यामध्ये शेवटी देय म्हणजेच भरणा करायची रक्कम दाखवण्यात येईल.
- त्यानंतर स्वयं सर्वेक्षण असा पर्याय दाखवला जाईल.
- ज्या शेतकऱ्यांना असा पर्याय दाखवला जाणार आहे, त्या शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत पुढील प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- जर ही प्रक्रिया त्या शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत केली नाही तर त्या शेतकऱ्याचा अर्ज बाद केला जाऊ शकतो व या योजनेतून त्या शेतकऱ्यास वगळण्यात येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.