सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना ही दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे जाहीर केले होती. त्या अनुदानाचे आतापर्यंत 173 कोटी 92 लाख रुपये राज्यातील 2 लाख 72 हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे अशी माहिती दुग्धविकास व्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे.
हे अनुदान अगोदर एक महिन्यासाठी देण्यात येणार होते, परंतु नंतर त्यात पुन्हा एक महिन्यांची वाढ करण्यात आली. म्हणजेच 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 या दोन महिन्यांसाठी हे अनुदान राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध व्यवसाय अडचणीत असल्यामुळे अनुदानाच्या रकमेची मागणी करण्यात आली होती. म्हणून राज्य सरकारने शासन निर्णयानुसार 5 जानेवारी 2024 रोजी राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले व तशी योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली.
एकूण 279 राज्यातील दूध प्रकल्पांनी अनुदान रकमेची मागणी केली होती. परंतु 235 प्रकल्पांनी ऑनलाईन नोंदणी केल्यामुळे सदर दूध प्रकल्पाच्या माध्यमातून दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी पात्र ठरले आहेत.
श्री मोहोड यांनी बोलताना माहिती दिली की, प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाईंना टॅगिंग करण्यात आले होते. त्यानुसार त्या गाईंची संख्या 10 लाख 18 हजार 856 होती. सदर गाईंच्या माध्यमातून दूध पुरवठा हा 35 कोटी 38 लाख 49 हजार 618 लिटर वर झाला. शेतकऱ्यांना अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी सदर योजनेची अंमलबजावणी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व सहकार या विभागामार्फत संयुक्तरीत्या करण्यात आली.
शासन निर्णयाची तरतूद होण्यासाठी प्राप्त अर्जांची छाननी करून जिल्हा नियोजन सहकारी व खाजगी प्रकल्पांना माहिती भरण्याकरता लॉगिन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आला होता. याचे नियोजन पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
खाजगी व सहकारी दूध प्रकल्प- 235
पात्र दूध उत्पादक शेतकरी- 2 लाख 72 हजार 299
टॅगिंग गाईची संख्या- 10 लाख 18 हजार 856
दुध पुरवठा- 35 कोटी 38 लाख 49 हजार 618 लिटर
अनुदान रक्कम- 176 कोटी 92 लाख 49 हजार रुपये
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.