आज आपण दूध उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. चालू वर्षी जानेवारी महिन्यात राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध अनुदान योजना सुरू केली आहे. गाईच्या दुधासाठी या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येते.
सदर योजनेची माहिती-
- या योजनेच्या माध्यमातून सहकारी संस्था व संघ व खाजगी दूध संस्थांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान यापूर्वी दिले जात होते. ते फक्त 1 महिन्यासाठीच दिले जाणार होते. परंतु शासनाने आता यामध्ये आणखी कालावधीची मुदतवाढ केली आहे.
- मागच्या काही महिन्यांपासून राज्यातील दूध खरेदी दरात मोठी घसरण झालेली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
- म्हणून या योजनेसाठी 34 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधासाठी निश्चित केला गेला आहे व प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली होती.
सदर योजनेतील काही बदल-
- ही योजना या अगोदर 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी राबवण्याची मान्यता दिली गेली होती.
- परंतु यात आता परत 1 महिना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असा जीआर राज्य शासनाने जाहीर केला आहे.
- म्हणजेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत सुद्धा दूध अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
- राज्याचे पशुपालन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी 1 महिना मुदतवाढ देण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे.
- म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी असे अशा या दोन्ही महिन्यात गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
सदर योजनेचा अर्ज करण्यासाठीची पात्रता-
- या योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन सॉफ्टवेअर मध्ये सर्व गुरांच्या tag ची नोंदणी करणे गरजेचे आहे.
- त्यानंतर शेतकऱ्यांचा युनिक आयडी तयार करुन तो दूध संघाकडे सादर करायचा आहे. यानंतरच आपण या योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now