सुकन्या समृद्धी योजना माहिती 2023

      आज आपण सदर लेखातून सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जर लाभ मिळवायचा असेल, तर मुलगी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडणे गरजेचे आहे. ही योजना केंद्र सरकारद्वारे देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.

      या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत उघडता येते. सरकारने बेटी बचाव बेटी पढाव योजनेतंर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. जे लोक आपल्या मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी पैसे जमा करू इच्छितात ते आपल्या मुलीचे खाते या योजनेतंर्गत उघडू शकतात.

      जर या योजनेतंर्गत मुलीचे खाते उघडायचे असेल तर तिचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे जुळ्या मुली जर एखाद्या कुटुंबात असतील तर त्यांना या योजनेचा स्वतंत्रपणे लाभ भ घेता येऊ शकतो म्हणजेच त्या कुटुंबातील तीन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

सदर योजनेचा व्याजदर-

  • या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सरकारकडून 7.6% रक्कम व्याजदराच्या स्वरूपात दिली जाते.
  • या योजनेचा माध्यमातून दरवर्षी किमान रु.250/- भरावे लागतात.
  • आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत या योजनेमध्ये कमाल 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लाभ दिला जातो.

सदर योजनेच्या नियम व अटी

  • सुकन्या समृद्धी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच पालकांद्वारे तिचे खाते उघडावे लागते.
  • या योजनेसाठी मुलीचे फक्त एकदाच खाते उघडता येऊ शकते, म्हणजे आईने स्वतंत्र खाते व वडिलांनी स्वतंत्र खाते उघडले आहे असे चालत नाही.
  • कुटुंबातील फक्त दोनच मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
  • जर कुटुंबात जुळ्या किंवा तीळ्या मुली जन्माला आल्या असतील, तर अशा परिस्थितीत दोन पेक्षा जास्त खाती देखील उघडता येऊ शकतात.
  • मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा 18 वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत आपणास सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालवता येऊ शकते.

सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • जमा रकमेवर या योजनेमध्ये टॅक्स भरावा लागत नाही.
  • जर लाभार्थ्याने 21 वर्षे पूर्ण झाल्यावर सुद्धा पैसे काढले नाही, तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाते.
  • या योजनेत दरवर्षी किमान रु.250/- भरावे लागतात. जर ते भरले नाही तर खाते बंद होईल. जर खाते पुन्हा सुरू करायचे असेल तर जितके वर्ष खाते बंद होते त्या प्रत्येक वर्षाला रु.50/- दंड आकारला जातो व खाते पुन्हा सुरू केले जाते.
  • जर एखाद्या कारणामुळे लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर जमा झालेली रक्कम व्याजासकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • रहिवासी पुरावा
  • मुलीच्या आई-वडिलांचा पासपोर्ट साईज फोटो
  • मुलीचा पासपोर्ट साईज फोटो
  • बँक व पोस्ट ऑफिसने मागणी केल्यानुसार इतर कागदपत्रे

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *