आज आपण किशोरी शक्ती योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील ग्रामीण आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात राहणाऱ्या मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होते. ही योजना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने राबवण्यात येते.आपल्या राज्यात भरपूर लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात.
अशा कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना त्यांच्या गरचा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर त्यांना आपल्या मुलींचा आरोग्य विषयक दर्जा सुधारण्यास, त्यांचे शिक्षण करण्यास, त्यांना योग्य आहार देण्यास अशी कुटुंब असमर्थ असतात. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने किशोर शक्ती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना बालकल्याण विभागामार्फत 15 मे 2004 रोजी गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
सदर योजनेचा उद्देश-
- या योजनेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होतो व त्याचबरोबर त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
- किशोरवयीन मुलींना शिक्षण मिळाले की त्यांची निर्णय क्षमता वाढवण्यास मदत मिळते.
- किशोरवयीन मुलींच्या बालविवाहास प्रतिबंध करणे.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींना घरगुती तसेच व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवता येते.
- ज्या किशोरवयीन मुली 11 ते 18 वर्ष वयोगटातील आहेत, त्यांचे पालन पोषण तसेच आरोग्य विषयक दर्जा सुधारण्याचा उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- किशोरवयीन मुलींना या योजनेच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत व परिसर स्वच्छता इत्यादी बद्दल प्रशिक्षण दिले जाते.
सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
- किशोरवयीन मुलींना या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम ही थेट मुलींच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केली जाते.
- या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
सदर योजनेची लाभार्थी निवड करण्याची पात्रता-
- या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 20 मुलींची 6 महिन्यासाठी निवड केली जाते.
- त्याच बरोबर 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींची निवड अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब याद्वारे केली जाते.
- या योजनेच्या माध्यमातून शाळा सोडलेल्या मुलींना प्राधान्य दिले जाते.
- अंगणवाडी केंद्राशी सदर वयोगटातील 3 मुलींना संलग्न ठेवण्यात येते. त्याचबरोबर त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते.
- सदर मुलींची निवड बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण आदिवासी आणि नागरी प्रकल्पात केली जाते.
सदर योजनेचे फायदे-
- या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात व त्याचबरोबर 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
- या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या प्रत्येक महिन्यात वजन घेतले जाते, त्याच बरोबर मुलींचे रक्त तपासून त्याच्यात हिमोग्लोबिनची मात्रा पाहिली जाते.
- या मुलींचे प्रशिक्षण घेऊन झाल्यानंतर त्यांच्याकडून इतर मुलींना अंगणवाडीच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या मुलींना पोषण, आरोग्य, व्यक्तिगत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, शिक्षण, मासिक पाळी त्याचे विज्ञान व स्वच्छता, गर्भावस्था मधील शरीर शास्त्र व गैरसमज, गर्भनिरोधन, बालविवाहाचे परिणाम, लैंगिक छळ झाल्यास कोणती मदत घ्यावी यासाठी हेल्पलाइन नंबरचा उपयोग, एड्स नियंत्रण व त्यावर प्रतिबंध, स्त्री विषय कायदे व हक्काची माहिती, विवाह कायदा व त्याची माहिती इत्यादी विषय बाबत मार्गदर्शन केले जाते व यासाठी अंगणवाडी मधील पुस्तके व भिंती पत्रके याचा वापर केला जातो
- या मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना मेहंदी काढणे, गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण, जैविक शेती, अकाउंटिंग, घरगुती विजेच्या उपकरणांची दुरुस्ती, केक बनवणे इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
- वारंवार मुलांना जन्म दिल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे देखील या योजनेच्या माध्यमातून समजावून सांगितले जातात.
- ज्या मुलींनी शालेय शिक्षण सोडले आहे त्या मुलींना अंगणवाडीच्या मदतीने शिक्षणाचे महत्त्व समजावून पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
- हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्त्व देखील सांगितले जाते.त्याचबरोबर त्यांना पूरक पोषण आहार देण्यात येतो.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 1 लाख रुपये पर्यंत खर्च केला जातो.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक किशोरवयीन मुलीचे किशोरी कार्ड तयार केले जाते, जेणेकरून त्यांना या योजनेतंर्गत शासनाकडून येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.
- मुलींना किशोर वयात योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना 18 वर्षानंतर स्वयंरोजगार दिला जातो.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- दारिद्र्य रेषेखालील कार्ड
- शाळेचा दाखला
- शालेय शिक्षण मार्कशीट
- जातीचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-
- अर्ज करण्यासाठी शासनाने कोणतीही ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिलेली नाही’
- त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या पालकांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी केंद्राला भेट द्यावी तसेच या योजनेचा अर्ज घ्यावा तसेच अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज अंगणवाडी केंद्रात जमा करावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.