जिल्हा परिषद तिसऱ्या टप्प्यातील भरतीचे वेळापत्रक जाहीर!!

पहिल्या दोन टप्प्यात या भरतीसाठी अनेक पदांची परीक्षा पूर्ण झालेली आहे. परंतु काही क कारणास्तव तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा अचानक रद्द करण्यात आली होती. परंतु आता तिसऱ्या टप्प्यासाठी नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

    आता तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 1 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 6 पदांसाठी घेतली जाणार आहे. 6 नोव्हेंबर 2023 रोजी या टप्प्यातील परीक्षेचा शेवटचा पेपर असणार आहे.

सदर भरतीसाठीची 6 पदांची नावे-

  1. कनिष्ठ आरेखक
  2. मेकॅनिक
  3. कनिष्ठ मेकॅनिक
  4. विस्तार अधिकारी (शिक्षण)
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  6. विस्तार अधिकारी (पंचायत)
पदांची नावेपरीक्षेची तारीख
मेकॅनिक, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ अरेखक1 नोव्हेंबर 2023
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी (शिक्षण)2 नोव्हेंबर 2023
विस्तार अधिकारी (पंचायत)6 नोव्हेंबर 2023

नोट-

 हॉल तिकीट डाउनलोड करण्याची साईट अजून बंद दाखवत आहे. परंतु सर्व उमेदवार आपले हॉल तिकीट डाऊनलोड परीक्षा सुरू होण्याच्या 4-5 दिवस अगोदर करू शकणार आहेत. ज्या पदांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे केवळ त्याच पदांचे हॉल तिकीट उमेदवारांना डाऊनलोड करता येणार आहे.

सदर परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची पद्धत-

  • सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर खालच्या बॉक्स मध्ये उमेदवारांना त्यांची जन्मतारीख म्हणजे अगोदर जन्माची तारीख, जन्माचा महिना व जन्माचे साल (उदा. 18-05-1995) अशा पद्धतीने टाकायचे आहे.
  • यानंतर तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड होणार आहे. त्यावर तुम्हाला तुमच्या परीक्षेच स्थळ व वेळ पाहता येणार आहे.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *