खुशखबर.. अंगणवाडी सेविकांसाठी नवीन शासन निर्णय जाहीर!

     आज आपण या लेखातून अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत कार्यरत असणाऱ्या तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना 2023-24 या वर्षासाठी दिवाळीला भाऊबीज भेट रक्कम देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.

     हा शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे. भाऊबीज भेटीसाठी 37 कोटी 33 लाख 2 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया भाऊबीज किती मिळणार आहे.

देण्यात येणाऱ्या भाऊबीजेची रक्कम-

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत 2023-24 या वर्षात प्रत्येकी रु.2,000/- एवढी भाऊबीज भेट देण्यात यावी, यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.

नोट- वरील माहिती आपणास आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *