ITEP म्हणजे काय?
आता सरकारी शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार B.Ed कोर्सला आता अभ्यासक्रमाचा दर्जा राहणार नाही. ITEP प्रोग्रॅम या कोर्सच्या जागी आता असणार आहे.
या प्रोग्रॅमला ITEP असे नाव देण्यात आले आहे. हा प्रोग्रॅम नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने तयार केला आहे. 4 वर्षांसाठी हा कोर्स असणार आहे. 2030 नंतर ITEP कोर्स द्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे.
वास्तविक पाहता B.Ed कोर्स सुरू राहणार आहे, पण तो फक्त शैक्षणिक भाग म्हणून. परंतु येणाऱ्या काही वर्षातच जवळपास सर्वच B.Ed महाविद्यालयात ITEP कोर्सचा पर्याय सुरु होणार आहे. 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक प्रकल्पाद्वारे 4 वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या अंतर्गत एकात्मिक शिक्षण कार्यक्रमाच्या पायलट प्रोजेक्टसाठी विद्यापीठाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विंडो उघडणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार 4 वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
नोट– वरील माहिती आपणास आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.