आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना याबद्दलची माहिती पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर काही पिके करपली आहेत,तर काही पिके काढणीनंतर वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू केली आहे.
या लेखातून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर आपणास वरील लेख आवड्ला तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
सदर योजनेची माहिती–
- ही योजना 18 फेब्रुवारी 2016 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू करण्यात आलेली आहे.
- शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी म्हणजेच कीड, नैसर्गिक आपत्ती, रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास इत्यादी कारणांसाठी ही योजना सुरू केलेली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 72 तासाच्या आत पिकाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.
- शेतकरी टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती देऊ शकतात. ही योजना एक राष्ट्र एक योजना याच्याशी सुसंगत केली आहे.
सदर योजनेचे फायदे-
- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी शेतकर्याला संपूर्ण विम्याची रक्कम देण्यासाठी शासनाकडून उर्वरित रक्कम अदा केली जाईल. तसेच शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर खूप कमी आहेत.
- शिल्लक प्रीमियम असेल तर ते सरकार 90% उचलते. त्याचबरोबर या सरकारी अनुदानावर कोणतीही कमाल मर्यादेचे बंधन नाही.
- योजनेद्वारे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल. पीक कापण्याचे प्रयोग कमी करण्यासाठी रिमोट सेन्सिंग ड्रोन व जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
- क्रॉप कटिंगची माहिती कॅप्चर आणि अपलोड करण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर केला जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांच्या दाव्याच्या पेमेंट मध्ये होणारा उशीर कमी करता येईल.
सदर योजनेची पात्रता-
- अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांकडे जर किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज खाते असेल. तर पत मर्यादेचे अधिसूचित पिकासाठी मंजूर किंवा नूतनीकरण केल जाईल.
- यामध्ये किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज खाते देखील समाविष्ट आहे. ज्याची क्रेडिट मर्यादा नूतनीकरण केलेली नाही.
सदर योजनेतंर्गतची समाविष्ट जोखीम-
1) पीक पेरणीस असमर्थ-
प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे शेतकरी पिकांची पेरणी करू शकत नसल्यास लाभ दिला जातो.
2) उत्पन्नाचे नुकसान-
नैसर्गिक आग आणि विद्युल्लता वादळ, चक्रीवादळ, टायफून, गारपीट, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीटक आणि रोग इ. या सर्व जोखमींमुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी हा विमा प्रदान करण्यात आलेला आहे.
3) काढणीनंतर नुकसान-
काढणीनंतर, अवकाळी चक्रीवादळ, वादळ किंवा गारपिटीमुळे जास्तीत जास्त 14 दिवस शेतात सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देईल.
4) स्थानिकीकृत आपत्ती-
अधिसूचित क्षेत्रातील गारपीट, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे होणारे नुकसान तसेच नुकसान देखील या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते.
सदर योजनेचा प्रीमियम दर-
हंगाम | पिके | शेतकऱ्यांना देय असलेला कमाल विमा शुल्क (%) |
खरीप | सर्व तृणधान्य (बाजरी आणि तेलबिया कडधान्य) | 2% किंवा वास्तविक दर यापैकी जे कमी असेल |
रब्बी | सर्व तृणधान्य (बाजरी आणि तेलबिया कडधान्य) | 1.5% SI किंवा एक्चुअल दर यापैकी जे कमी असेल |
खरीप आणि रब्बी | वार्षिक बागायती पिके | असेल5% SI किंवा एक्चुअल दर, यापैकी जे कमी असेल |
- नोट- प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपणास ऑनलाइन अर्ज करता येतो.
धन्यवाद !