शेतात विहीर खोदायची असेल तर आता मिळवा 4 लाखापर्यंतचे अनुदान

आपले सरकार हे कायमच शेतकऱ्यांसाठी फायदेमंद ठरणाऱ्या योजना घेऊन येत असते. सरकारने अशीच एक योजना राबवण्याचा निर्णय हाती घेतला आहे. तिचे नाव आहे विहीर अनुदान योजना. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ व्हावी यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

   आज आपण या लेखातून योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, तिची पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, तिचे अनुदान किती मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सदर योजनेची माहिती-

  • ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे चालू करण्यात आलेली आहे.
  • आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे तिचे नाव आहे विहीर अनुदान योजना.
  • या योजनेला मागेल त्याला विहीर योजना असेही म्हटले गेले आहे.

सदर योजनेचा उद्देश-

  • आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्याचबरोबर त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • जे गरीब शेतकरी आहेत त्यांना शेतात पिकांसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • राज्यातील दारिद्र्यता संपवणे व शेतकऱ्यांना सशक्त त्याचबरोबर आत्मनिर्भर बनवणे हा हेतू देखील या मागचा आहे.
  • या योजनेच्या साह्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर राज्यातील इतर नागरिक देखील शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.

सदर योजनेचे लाभार्थी-

  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी म्हणजेच जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील.
  • जर महिला करता असेल तर ती महिला देखील यासाठी पात्र असेल.
  • इंद्रा आवास योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर जॉब कार्डधारक व्यक्ती
  • ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पर्यंत जमीन आहे म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असल्यास ते कुटुंब पात्र असणार आहे.

सदर योजनेची लाभार्थी निवड प्रक्रिया-

  • ही प्रक्रिया ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येईल.
  • ग्रामसभा/ग्रामपंचायतच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.
  • 15 दिवसाच्या आत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.

सदर योजनेचे कागदपत्रे-

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • 7/12 व 8अ उतारा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
  • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करार पत्र

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

  • आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  • अर्जपेटी ही दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतचे असेल.
  • जर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असेल तर अर्जदाराला महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *