PMKVY/प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

       आज आपण कौशल्य विकास योजनेबद्दलची माहिती सदर लेखांमध्ये पाहणार आहोत. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्याद्वारे प्रशासित 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. ही योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्याद्वारे कार्यान्वित केली जाते. याचा मुख्य फायदा असा आहे की इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असलेले कौशल्य ट्रेनिंग युवकांना प्रदान केले जाते. त्यांना त्याचे सर्टिफिकेट देखील दिले जाते व त्याद्वारे त्यांना रोजगार देखील मिळतो. आधीपासून अनुभव असणारे गरजू तरुण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

       खरं तर रोजगार मिळवून देण्यासाठी या योजनेचा तुम्हाला फायदा होतो व तसेच त्याला प्लेसमेंट असिस्टंट असे देखील म्हटले जाते.या योजनेच्या माध्येमातून लाभधारकांना 150 ते 300 तासांचे एक छोटेसे ट्रेनिंग दिले जाते. जेथे तुम्ही ट्रेनिंग घेत त्या ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक अटेंडन्स द्यावी लागते. या योजनेच्या माध्येमातून लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा प्रदान केला जातो. जर विद्यार्थी काही अडचणीमुळे ट्रेनिंग पूर्ण करू शकले नाही किंवा ट्रेनिंग मध्ये पास होऊ नाही शकले तर त्यांना पुन्हा एकदा ते ट्रेनिंग दिली जाते.

सदर योजनेचे फायदे-

  1. या योजनेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कौशल्य विकास माहिती सेंटर यांच्या द्वारे देखील मार्गदर्शन दिले जाते.
  2. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ऑनलाईन माहिती तसेच मार्गदर्शन देणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जाते.
  3. मार्गदर्शनासाठी हेल्पलाइन नंबर देखील दिला जातो. त्याचबरोबर डिजिटल कन्टेन्ट देखील उपलब्ध करून दिला जातो.
  4. या योजनेच्या माध्येमातून सॉफ्ट स्किल, उद्योजकता ,फायनान्स व डिजिटल नॉलेज देखील दिले जाते.
  5. तसेअपघात विमा, स्टायपेंडचा देखील फायदा दिला जातो.

सदर योजनेची पात्रता-

  1. या योजनेची वयोमर्यादा किमान 18 वर्षे एवढी आहे.
  2. या योजनेसाठी हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.
  3. ज्या लोकांकडे उत्पन्नाचे कोणते साधन नाही अशा लोकांसाठी ही योजना आहे.
  4. जे भारतीय तरुण बेरोजगार/कॉलेज ड्रॉप आऊट असतील.

सदर योजनेची कागदपत्रे-

  1. मतदान कार्ड
  2. आधार कार्ड
  3. ओळखपत्र
  4. मोबाईल नंबर
  5. बँक अकाउंट पासबुक
  6. फोटो

सदर योजनेचे ट्रेनिंग सेंटर कसे शोधावे-

  1. सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. नंतर होम पेज वर जाऊन Find a Training Centre येथे क्लिक करा.
  3. पुढे नवीन पेजवर सर्च बाय सेक्टर, सर्च बाय जॉब रोल,व सर्च बाय लोकेशन यातील एक पर्याय निवडून माहिती भरा.
  4. शेवटी सबमिट बटन वर क्लिक केले की ट्रेनिंग सेंटरची माहिती उपलब्ध होईल.

नोट-

अर्ज प्रक्रिया करण्यासाठी www.pmkvyofficial.org  या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या.

जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *