महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना. महिलांसाठी खुशखबर!!!

आपले सरकार कायमच महिलांच्या हिताच्या दृष्टीने विचार करत असते व त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक महिला समृद्धी कर्ज योजना 2023 सरकार राबवत आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण त्या योजनेविषयीच्या अनेक गोष्टींची माहिती पाहणार आहोत, जसे की योजनेची पात्रता, उद्दिष्टे, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी अर्ज करण्याची पद्धत इत्यादी.

सदर योजनेची माहिती

         या योजनेच्या माध्यमातून महिला व्यवसायिकांना तसेच महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. आपल्या राज्यात बहुतांश महिला शिक्षित आहेत व रोजगाराच्या शोधात असतात, परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असतानाही कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे त्यांच्या जवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते व ते स्वतःचा एखाद लघु उद्योग सुरु करण्यासाठी असमर्थ ठरतात.

    तसेच बहुतांश बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था महिला उद्योजकांना कर्ज देण्यासाठी तयार होत नाहीत. कारण महिला कर्जाची रक्कम परत फेडू शकतील याची त्यांना शाश्वती नसते. त्यामुळे महिलांचे स्वतःचा उद्योग सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सदर योजनेचे उद्दिष्ट-

  • राज्यातील बचत गटातील महिलांच्या उद्योगाला प्रोत्साहन म्हणून त्यांच्या लघु उद्योगास आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • ज्या महिला बचत गटांनी त्या बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा अशा हेतूने व्यवसाय सुरू केला आहे, त्या महिलांना प्रोत्साहन मिळावे हा देखील योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास देखील होईल.
  • राज्यातील होतकरू महिलांना स्वालंबी, आर्थिक दृष्ट्या बळकट, आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिलांची आर्थिक व सामाजिक स्थिती उंचावण्यास मदत होणार आहे.
  • त्याचबरोबर स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करणाऱ्या महिलांना देखील यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यामुळे त्यांचे जीवनमान बदलून जाईल.
  • या योजनेचे अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. तसेच कमीत कमी कागदपत्रे ठेवण्यात आलेली आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले जाईल. म्हणजेच 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध असणार आहे.
  • या योजनेचा प्राप्त कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्ष ठेवण्यात आलेला आहे.

सदर योजनेची पात्रता व अटी-

  • अर्जदार महिला राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिला समृद्धी कर्ज योजनेतंर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो. परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील 5% रक्कम भरावी लागेल.
  • ज्या बचत गटाची स्थापना होऊन किमान 2 वर्षाचा कालावधी झाला आहे. अशाच बचत गटातील महिला या योजनेसाठी पात्र राहतील.
  • महिला समृद्धी कर्ज योजनेतंर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल.
  • अर्जदार महिला ही दारिद्र रेषेखाली असणे आवश्यक आहे. तसेच तिचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.

सदर योजनेची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • जन्माचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!
WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *