आज आपण ई-श्रम कार्ड बद्दल माहिती पाहणार आहोत. या कार्ड बद्दल बहुतेक लोकांना माहिती नसल्यामुळे ते काढावे की नाही हे समजत नाही. जर आपणास हे कार्ड काढायचे असेल तर त्याबद्दलचे फायदे व तोटे आपणास माहिती पाहिजेत. या लेखातून आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
देशाच्या असंघटित क्षेत्रात कर्य करणाऱ्या कामगारांना सरकारकडून हे कार्ड दिले जाते. ई-श्रम कार्ड प्रमाणेच सरकार एक डेटाबेस तयार करत आहे. ज्यामुळे शासनाने काढलेल्या सुविधा, योजना आणि कार्यक्रमांचा देशाच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना फायदा होईल. तसेच प्रत्येकाचा सर्व डेटा त्यात असेल.
ई-श्रम कार्डसाठी लागणारी पात्रता-
- अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
- अर्जदाराचे वय 16 ते 59 वर्षे असावे.
- अर्जदार आयकर (incometax) भरणारा नसावा.
- अर्जदार EPFO आणि ESIC चा सदस्य नसावा.
ई-श्रम कार्डचे फायदे-
- ई-श्रम कार्डसाठी अर्ज केल्यास तुम्हाला सरकारकडून एक विशेष ओळखपत्र मिळेल. ज्यावर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो.
- ई-श्रम कार्डसाठी अर्ज केल्याने, तुम्हाला पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ देखील मिळेल आणि सरकार त्याचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम कव्हर करेल.
- भविष्यात सरकारने कामगारांसाठी कोणतीही योजना आणल्यास त्याचा थेट लाभ कामगारांना मिळेल.
- नवीन आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- कोणत्याही आपत्तीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक लाभ आगामी काळात द्यायचा असेल, तर या ई-श्रम कार्डचा डेटा सर्व मजुरांनसाठी उपयुक्त ठरेल.
- जर ई-श्रम कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा अर्ज करू शकता.
- ई-श्रम आणि एनसीएस (नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल) च्या एकत्रीकरणामुळे हजारो ई-श्रम नोंदणीकृत लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
ई-श्रम कार्डचे संभाव्य फायदे-
- जर एखादी व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करत असेल आणि त्याने त्याचे ई-श्रमिक कार्ड बनवले असेल, तर सरकार आगामी काळात त्याच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊ शकते.
- सध्या देशातील सर्व लोकांना समान प्रमाणात रेशन मिळते, मग ते असंघटित क्षेत्रात काम करतात की नाही याची परवा न करता, ई-श्रमिक कार्डच्या डेटाच्या आधारे इतर लोकांच्या तुलनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इतर नागरिकांपेक्षा जास्त रेशन मिळण्याची शक्यता आहे.
- भविष्यात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना बिनव्याजी कर्ज देण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे.
- देशात असे अनेक मजूर आहेत जे दैनंदिन कमाई करून आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी घरही नाही. अशा परिस्थितीत भविष्यात सरकार त्यांना पीएम आवास योजनेंतर्गत घरे देऊ शकते.
- ई-लेबर कार्डच्या डेटाबेसच्या आधारावर, राज्य सरकारांकडून तुमच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्याची रक्कम दिली जाऊ शकते, जसे की उत्तर प्रदेश सरकारने दिलेली देखभाल भत्त्याची रक्कम (4 महिन्यांसाठी ₹ 500 / दरमहा).
- ई-लेबर कार्डमुळे केंद्र व राज्य सरकारने मजूर व कामगारांसाठी आणलेल्या विविध योजनांचा लाभ सहज घेता येणार आहे.
- पेन्शनची रक्कम ही 60 वर्षांनंतर दरमहा मिळण्याची सुविधा देखील उपल्बध आहे.
- मोफत सायकल, मुलांना शिष्यवृत्ती, मोफत शिलाई मशीन इत्यादी.कामगार विभागाच्या योजना
- कामगारांना त्यांच्या कामानुसार मोफत साधने दिली जातील.
- नंतर रेशनकार्डही लिंक केले जाईल जेणेकरून रेशन कुठूनही घेता येईल.
ई-श्रम कार्डचे तोटे-
- जर तुम्ही ई-लेबल कार्ड तयार केले असेल आणि तुम्ही असंघटित मजूर नसाल, तर सरकार जो डेटा गोळा करेल, त्यात असंघटित गरीब मजुरांसह इतर लोकांचा डेटाही येईल. त्यामुळे डेटा पडताळण्यासाठी वेळ लागेल.
- जर एखाद्याचे पीएफ खाते असेल आणि त्याने ई-लेबर कार्ड बनवले असेल, तर त्यामुळे कुठेही अर्ज करताना संघर्ष करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत-
तुम्ही श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत-
तुम्ही कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन ऑफलाइन ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करू शकता.
ई-श्रम कार्डची नोंदणीसाठीचे आवश्यक कागदपत्रे-
- कामगाराचा मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- कामगाराचा आधार क्रमांक
- आधार क्रमांक लिंक मोबाईल नंबर
- बचत बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शिधापत्रिकेशी संबंधित सर्व माहिती
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
अधिकृत माहितीसाठी https://eshram.gov.in/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद !