बांधकाम कामगार योजना 2023

   आज आपण कल्याणकारी योजना म्हणजेच बांधकाम कामगार योजना याबद्दलची माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना आर्थिक मदत देखील प्रदान केली जाते.

सदर योजनेची वैशिष्ट्ये-

  • ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर होण्यास मदत होते व तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील मदत होते.
  • या योजनेतंर्गत लाभार्थी कामगारांच्या कुटुंबीयांस विविध प्रकारचे लाभ दिले जातात तसेच त्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केले जातात.
  • या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली आहे. त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करू शकतील. त्यामुळे अर्जदार कामगारास अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. त्याच बरोबर अर्जदार कामगाराच्या वेळेची आणि पैशाची बचत होण्यास मदत होईल. तसेच अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती त्याला मोबाईलवर दिसेल.

सदर योजनेचे मुख्य चार प्रकार-  

  •  सामाजिक सुरक्षा-
    • नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या होणाऱ्या खर्चासाठी रु. 30,000/-एवढे अनुदान दिले जाते.
    • दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सर्व नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार 30,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.
    • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब 5,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
  •  शैक्षणिक सहाय्य-
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 1ली ते 7वी मध्ये किमान 75% किंवा अधिक गुण असल्यास 2500/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 8वी ते 10वी मध्ये किमान 75% किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी 5,000/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता 1 लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता 60,000/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
    • संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते.
  •  आरोग्य विषयक सहाय्य-
    • नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस 2 जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15,000/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20,000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
    • जर आरोग्य विमा योजना लागू नसेल तर लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचे वैद्यकीय सहाय्य दिले जाते. ही मदत कुटुंबातील 2 व्यक्तींसाठी मर्यादित असते. त्याचबरोबर एका व्यक्तीस एकदाच लागू होते.
    • कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1 लाख रुपये मुदत बंद ठेवचा लाभ दिला जाईल.
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जाईल.
  •  आर्थिक सहाय्य-
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
    • नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी व अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण अर्थसहाय्य्य योजनेतंर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
    • घर बांधणीसाठी 4.5 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल.
    •  नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त 5 वर्षांपर्यंत प्रतिवर्षी 24,000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
    • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास 6,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

सदर योजनेची लाभार्थी पात्रता-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग 1 वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  • नोंदीत बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. असे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • जर नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधायचे झाल्यास त्याच्याकडे जर अगोदरची मालकीचे कच्चे घर असेल तर त्या ठिकाणी बांधता येते किंवा पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असली तरीही बांधता येते.
  • त्याचबरोबर शासनाच्या इतर कोणत्याही गृह निर्माण प्रकल्प योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच मंडळामार्फत गृह कर्जावरील व्याज देण्याकरता अर्थसाहयाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा व याबाबतचे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहे.
  • एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगारास या योजनेचा लाभा घेता येणार नाही.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • ओळखपत्राची प्रत(सक्षम प्राधिकाऱ्याची)
  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • बँक पासबुकची प्रत
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
  •  इंजिनिअर किंवा ठेकेदार कडे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला
  • महानगर पालिकेकडचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • पिवळे रेशनकार्ड/अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड/केशरी रेशनकार्ड/ अन्नपूर्णा रेशनकार्ड
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • ग्रामपंचायतकडून/ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • नोंदणी फी 25/- रुपये व वार्षिक वर्गणी 60/- रुपये (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी 1/- रुपये

नोट-

अधिक माहितीसाठी  mahabocw.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *