{अर्ज पुन्हा सुरू} मागेल त्याला शेततळे योजनेत वाढ

शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. अशावेळी शेतातील पिकांना पाणी देण्याचे दुसरे साधन नसते. पाण्याची कमतरता भरून काढण्याचा उत्तम पर्याय म्हणजे शेततळे. आपले सरकार हे शेततळ्यासाठीच्या विविध योजना राबवत असते. आता आपण वैयक्तिक शेततळे ही करू शकता. आता शासनाने 30*30 शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात बदल केला आहे. शेतकरी बंधू आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शेततळ्यासाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी किती अनुदान मिळणार आहे? अटी काय आहे? याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

सदर योजनेसाठी लागणाऱ्या अटी-

  • शेतकऱ्याने जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य करणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून अनुदान घेतलेले नसावे. म्हणजेच यापूर्वी त्याने मागील त्याला शेततळे योजना किंवा सामूहिक शेततळे भात खासरातील बोडी योजना नाहीतर इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे घटकाकरिता अनुदान घेतलेले नसावे. असाच शेतकरी या योजनेत अर्ज करण्यासाठी पात्र असेल.
  • जर शेतकऱ्यास शेततळे अनुदान मिळवायचे असेल, तर अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे.

सदर योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम-

  • आता 30 *30 लांबीच्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • यासाठी ऑनलाईन अर्ज शासनाच्या पोर्टलवर सुरू झालेले आहेत. जर आपणास शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत.
  • आपण हा अर्ज कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅब किंवा महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन भरू शकता.

सध्याच्या डिजिटल युगात बहुतांश लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत असतात. त्यामुळे अनेक बँका मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही बँकेत न जाता लाखो ट्रान्सफर करू शकता. मात्र एवढे होऊन देखील धनादेशाद्वारे पेमेंट करणे कमी झालेले नाही. अजूनही अनेक मोठे आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात.

      जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक वेळा काही छोट्या-मोठ्या चुकीमुळे चेक बाउन्स होत असतात. त्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सुद्धा येऊ शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणत्या चेकच्या मागच्या बाजूस सही केली जाते? कोणत्या कारणामुळे केली जाते? खूप लोकांना माहिती नसेल, चला तर मग जाणून घेऊ या.

      बेरर चेक असेल तरच त्या चेकच्या मागील बाजूस सही करावी लागते. ऑर्डर चेक असेल तर मागे सही करण्याची गरज नाही. बेरर चेक हा तुम्हाला बँकेत जाऊन जमा करावा लागतो आणि अशा वेळेस ते पैसे आपल्या खात्यावर जमा न होता, कॅश काऊंटरवरच आपल्याला रोख स्वरूपात मिळतात.

      बेरर चेकच्या मागे सही करण्याचा नियम अनेक वेळा चेक वरील स्वाक्षरी पडताळणी करण्यासाठी बँकांना चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी देखील आवश्यक असते. परंतु हे तेव्हाच आवश्यक आहे, जेव्हा तिसरी व्यक्ती म्हणजेच ज्याने चेक दिलाय हा व्यक्ती आणि ज्याच्या नावे दिलाय हा व्यक्ती सोडून इतर म्हणजे तिसरीच व्यक्ती तो चेक घेऊन बँकेत येते. अशा व्यक्तीसाठी चेकचा पाठीमागे सही करणे आवश्यक असते.

    तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बेरर चेक वापरत असल्यास चेकच्या मागील बाजूस सही करणे गरजेचे नाही. याशिवाय क्रॉस आणि ऑर्डर चेकच्या मागील बाजूस ही सही करण्याची गरज नाही. जेव्हा आपल्या चेकची रक्कम 50,000/- रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँक ऍड्रेस प्रूफही घेते.

राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या अनुदान रकमेत वाढ करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. 28 जून 2023  रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेमध्ये पाचशे रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

      अगोदर या लाभार्थ्यांना 1000/-  रुपये प्रति महिना एवढे निवृत्तीवेतन मिळत होते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500/- रुपये प्रति महिना एवढे निवृत्तीवेतन मिळणार आहे.

      तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला सरकारी निमशासकीय किंवा खाजगी नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन, मग त्या लाभार्थ्याची  पात्रता ठरवली जाणार आहे.

      यासोबतच 2019 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्याच्या मुलाची 25 वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात आलेली आहे. तसेच याची अंमलबजावणी ही शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून होणार असल्याचे देखील शासण निर्णयातून नमूद करण्यात आलेले आहे.

नोट-

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट – https://mahadbt.maharashtra.gov.in 

जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *