आता आपल्या शेतात किंवा मोकळ्या जागेत टॉवर लावून कमवा 50 ते 75 हजार रुपया पर्यंत, जाणून घेऊया सविस्तर माहिती.

        आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून आपल्यासाठी वेगवेगळ्या नवनवीन योजनेची, नवनवीन नोकरीच्या संधींची व त्याचबरोबर नवनवीन बातम्यांची माहिती घेऊन येत असतो. राज्य सरकार व केंद्र सरकार नवनवीन योजना व माहिती आणत असतात, पण काही कारणास्तव ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

       जर आपल्याकडे मोकळी जागा शिल्लक असेल आणि त्या जागेचे तुम्हाला पैसे मिळवायचे असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर लावून दिला, तर तुम्हाला महिन्याला 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत पैसे मिळवता येणार आहेत. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

        तुम्ही तुमचा मोकळ्या जागेत(Airtel, Idea, Jio) कंपनीचे टॉवर लावू शकता. तुम्ही हे तुमच्या छतावर देखील लावू शकता. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत देखील मोबाईल टॉवर उभे करू शकता. यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

खोट्या जाहिरातींपासून सावध राहा

     आपण रोज पेपर वाचत असतो. पेपरमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसून येत असतात. पेपरमध्ये मोबाईल टॉवर बसवण्यासाठीच्या जाहिराती देखील येतात. तरी आपण अशा जाहिराती पासून सावध राहावे. जर तुम्ही या जाहिरातीला बळी पडला तर तुमच्यावर फसवेगिरीची कार्यवाही होऊ शकते.

    आज आपण या लेखातून तुम्हाला 100%  खरी माहिती सांगणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या शेतात टॉवर बसवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे द्यावे लागत नाही. टॉवर बसवण्यासाठीचा लागणारा संपूर्ण खर्च हा मोबाईल कंपनी द्वारे केला जातो. त्यामुळे तुम्ही कोणालाही एक रुपया सुद्धा देऊ नये.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते

  1. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुमच्याकडे 2 हजार ते 2.5 हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे.
  2. मोबाईल टॉवर छतावर बसवण्यासाठी तुम्ही शहरी भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे व त्यासाठी तुमच्या छतावर 500 स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर ग्राम पंचायतचे न हरकत प्रमाणपत्र.
  • तुम्ही जर शहरी भागातील राहणारे असेल तर महानगरपालिकेचे न हरकत प्रमाणपत्र.
  • ज्या जागेत मोबाईल टॉवर बसवायचा आहे त्या जागेचा 7/12 उतारा.
  • कंपनी सोबत केलेला करार नामा.

मोबाईल टॉवरचे महिन्याला किती पैसे मिळतात

 जर तुम्ही मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल टॉवर बसवला तर तुम्हाला प्रति महिना 10 हजार ते 75 हजार रुपये टॉवर कंपनीच्या मार्फत दिले जातात.

नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

 धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *