ट्रॅक्टर चालवण्यासाठी आता डिझेलची गरज नाही ? अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा.

       आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शेतीमध्ये सगळ्यात जास्त वापर असलेले आणि शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे असलेले कुठले यंत्र असेल तर ते म्हणजे ट्रॅक्टर.. अगदी जमिनीची पूर्व मशागत ते पिकांची काढणीनंतर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. सध्याच्या काळात डिझेल आणि पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे सहाजिकच डिझेल आणि पेट्रोल परवडणे शक्य नाही. त्याचबरोबर डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरचा शेतात वापर करतानाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ होते. या सगळ्याचा विचार करून कंपन्यांचा कल इलेक्ट्रॉनिक्स कार आणि बाईक निर्मितीकडे वाढला आहे. ग्राहक देखील इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.

       आता भारतीय ट्रॅक्टर उद्योगांनी देखील उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये गेल्या काही दशकांपासून खूप चांगली प्रगती केली आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतामध्ये देखील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला असून, त्या ट्रॅक्टरला कंपनीने टायगर इलेक्ट्रिक असे नाव दिलेले आहे. हा ट्रॅक्टर सोनालिका कंपनीने लॉन्च केला आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया या लेखातून ट्रॅक्टरची किंमत किती? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

सदर ट्रॅक्टरची किंमत व वैशिष्ट्ये-

  • कंपनीने त्याची किंमत 5 लाख 99 हजार रुपये इतकी ठेवली आहे.
  • या ट्रॅक्टरचे नाव टायगर इलेक्ट्रिक असे नाव असे ठेवण्यात आलेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हे ट्रॅक्टर तयार केले आहेत. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे रचना आणि संपूर्ण डिझाईन युरोपमध्ये तयार करण्यात आली असून हा एक उत्सर्जन मुक्त ट्रॅक्टर आसल्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारे आवाज येत नाही.
  • या ट्रॅक्टरचे अनेक फायदे आहेत. हा ट्रॅक्टर अधिक शक्तीमान व त्याचबरोबर तो पर्यावरणाला अनुकूल देखील आहे.
  • या ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ट्रॅक्टर मधून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप आरामदायी मानला जात आहे. डिझेल इंजिन असणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत या ट्रॅक्टरचा मेंटेनन्स देखील कमी आहे.
  • स्टार्टअप असलेल्या सेलेस्टियल मोबाईल ईटीने भारतात पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या कंपनीने तीन ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत व ही कंपनी हैदराबाद मध्ये आहे. या ट्रॅक्टरची क्षमता 27 अश्‍वाशक्ती, 35 आणि 55 अश्वशक्ती अशा प्रकारे आहे.
  • या ट्रॅक्टरची किंमत 6 लाख ते 8 लाखांपर्यंत असून यामध्ये इलेक्ट्रिक सर्किट कंट्रोल युनिट देण्यात आलेले आहे.. सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बुकिंग साठी अंदाजे 5 लाख 99 हजार रुपये इतकी एक्स शोरूम किंमत आहे. नोट- जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *