गाय गोठा अनुदान योजना

आज आपण सदर लेखातून केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास होण्यास मदत होईल. गाय गोठा अनुदान योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांच्यासाठी पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

सदर योजनेचे गोठा/शेड बांधण्यासाठीचे अनुदान –

1) गाय गोठा अनुदान –

  • 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधला जातो. त्यासाठी 77,188/- रुपये अनुदान दिले जाते.
  • 12 गुरांसाठी या योजनेंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते.
  • 18 गुरांसाठी या योजनेंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.

2) शेळी पालन शेड अनुदान

  • या योजनेंतर्गत 10 शेळ्यांसाठी 49,284/- रुपये अनुदान दिले जाते.
  • 20 शेळ्यांसाठी या योजनेंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते.
  • 30 शेळ्यांसाठी या योजनेंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.

3) कुकुट पालन शेड अनुदान

  • 100 पक्षांसाठी 49,770/- रुपये अनुदान दिले जाते.
  • 150 पक्षांसाठी दुप्पट अनुदान दिले जाते.

4) भू-संजीवनी नाफेड कंपोस्टिंगसाठीचे अनुदान –

या योजनेंतर्गत 10,537/- रुपये अनुदान दिले जाते.

 सदर योजनेची कागदपत्रे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा 2 फोटो
  • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचे मतदान कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • रहिवासी दाखला
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • जन्माचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
  • ना हरकत प्रमाणपत्र.
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड
  • जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडावे.

           या योजनेचा अर्ज हा आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घ्यावा. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे.या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील राहणाऱ्या रहिवाशांसाठी आहे.

नोट-जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *