आपल्या राज्याचे सरकार हे आपल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना कायम राबवत असते. या योजनेतून लोकांच्या राहणीमानात बदल होत असतो. त्यांना अशा योजना राबवल्यामुळे खूप फायदा मिळत असतो. शेतीवर हवामान बदलामुळे खूप विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वर्षापासून दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे भूजल साठ्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेती पिकांची उत्पादकता घटत चालली आहे.
या प्रतिकूल परिस्थितीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अशीच एक योजना सुरू केली आहे. जिचे नाव आहे मधुमक्षिका पालन योजना. अशी ही मधुमक्षिका पालन योजना नक्की काय आहे, या योजनेचे उद्दिष्ट, तिचे फायदे, लाभार्थी निवडीची प्रक्रिया व निकष, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी अशी संपूर्ण माहिती या लेखातून आपण पाहणार आहोत.
1) सदर योजनेचे फायदे-
- मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळू शकतो.
- मधुमक्षिका पालन हा व्यवसाय समूह किंवा व्यक्तीद्वारे सुरू करता येतो.
- बाजारात मध आणि मेणाची मागणी खूप जास्त आहे. या व्यवसायाद्वारे प्रशिक्षणार्थी मध, मेण तसेच रॉयल जेली उत्पादन, परागकण, मौनी विष मिळवू शकतात.
- मधमाशी पालन हे कमी उत्पादन देणाऱ्या शेतीतही केले जाऊ शकते.जेथे मेणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते.
- मधुमक्षिका पालन केल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम हा पर्यावरणावर होतो व त्याचबरोबर इतर शेती उत्पादनातही वाढ होते.
2) सदर योजनेची कर्ज मिळण्याची पद्धत-
- मधुमक्षिका पालन योजनेंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- त्यापैकी एकूण खर्चाच्या 65% कर्ज शासनाकडून आणि 25% अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे दिले जाते .
- त्यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्यास केवळ 10% रक्कम गुंतवावी लागते.
- केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 मधमाशांचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50% अनुदान देण्याची घोषणा केली गेली आहे. त्याचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे.
3) सदर योजनेचा लाभ-
- मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- त्यासाठी अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असावा.
- या योजनेंतर्गत मधुमक्षिका पालनाचे काम केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
4) सदर योजनेच्या लाभार्थ्यांची निवड-
- मधुमक्षिका पालन योजनेद्वारे आयोजित प्रशिक्षणाची माहिती वृत्तपत्रातून दिली जाते.
- त्यानंतर नाबार्ड नेहरू युवा केंद्र अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक वित्त व विकास मंडळ, महिला मंत्रालयाकडे आलेल्या अर्जाची छाननी केली जाते.
- प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
- त्यानंतर महिला, बेरोजगार युवक, आदिवासी, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.
5) सदर योजनेचे उद्दिष्ट-
- या योजनेच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या गाव, समूहात मधुमक्षिका पालन करणाऱ्या व्यक्तींना, भूमिहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पादन मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे.
- ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी चालना मिळावी.
- या व्यवसायाच्या माध्यमातून पूरक उत्पन्न मिळवून देणे. त्याचबरोबर ग्रामीण भागाती लोकांसाठी रोजगार उपलब्ध करणे देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे.
6) सदर योजनेची पात्रता व निकष-
- या घटकांतर्गत जास्तीत जास्त 50 मधुमक्षिका संच 50 स्टॅंडर्ड मधुमक्षिका पेटी व मध काढणी यंत्र.
- फूड ग्रेट मध कंटेनर खरेदीसाठी अनुदान आहे.
- ज्या प्रमाणात खरेदी केली जाईन त्या प्रमाणे अनुदानाचा लाभ दिला जाईल.
7) सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-
- ज्यांना मधुमक्षिका संच या घटकांतर्गत लाभ घ्यायचा असेल. अशा लाभार्थ्याने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या महापोकरा अधिकृत संकेतस्थळाला dbt.mahapocra.gov.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
- या योजनेचे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.
- सोबत खरेदी देयकांच्या मूळ प्रती तसेच खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अपलोड करावे.
- निवड झालेल्या लाभार्थ्याने खरेदी समितीच्या उपस्थितीत मधुमक्षिका वसाहत संच व मध काढणी यंत्र इत्यादीची खरेदी करणे गरजेचे आहे.
- पूर्वसंमती मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत मधुमक्षिका संशोधन व इतर आवश्यक बाबींची खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
- मधुमक्षिका पालन करण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
8) सदर योजनेच्या अटी व शर्ती-
- या योजनेच्या माध्यमातून फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येऊ शकतो.
- मधुमक्षिका पालन करण्यासाठी लागणारी इतर व्यवस्था लाभार्थ्याला स्वतः करावी लागेते.
- लाभार्थ्यांनी किमान मधुमक्षिका पालन हा व्यवसाय 3 वर्ष करणे आवश्यक आहे.
- मधुमक्षिका पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण मधुमक्षिका पालन घटकांतर्गत देण्यात याते.
- या घटकास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखराच्या संकेतस्थळावर जाऊन ग्रामसभा कार्यालयातील नोटीस बोर्ड इत्यादींद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.
9) सदर योजनेची कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँकेचे पासबुक
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.