जे तरुण तरुणी नोकरीच्या शोधातच आहेत, त्यांच्यासाठी आज आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जागा सुटल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज कसा करायचा. या लेखातून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
एकूण रिक्त पदे – 998
पदांची नावे व तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1. | हँडी मन | 971 | 10 वी उत्तीर्ण |
2. | युटिलिटी एजंट पुरुष | 20 | 10 वी उत्तीर्ण |
3. | युटिलिटी एजंट महिला | 7 | 10 वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 28 वर्ष आहे. ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षाची तर मागासवर्गीय प्रवर्गाला 5 वर्षाची सूट आहे.
शुल्क –1) खुल्या प्रवर्गासाठी व ओबीसी प्रवर्गाला 500 रुपये शुल्क आहे.
2) मागासवर्गीय प्रवर्गाला आणि माझी सैनिक यांना शुल्क माफ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ – अधिक माहितीसाठी http://www.aiasl.in/ या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, ए.आय. एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, जी.एस.डी. कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, सी.एस.एम.आय. विमानतळ, टर्मिनल– 2, गेट क्रमांक– 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 400099.
नोट-जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now