आपले शासन हे अनेकदा राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते. सरकार या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या उन्नतीसाठी,म प्रगतीसाठी प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी एसटी प्रवास आता मोफत केला आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या अगोदर जेष्ठ नागरिकांना प्रवासात 50 % सूट दिली जात होती. परंतु आता शासनाच्या नवीन नियमानुसार वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी सेवेसह सर्व प्रकारच्या एसटी सेवा या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास या योजनेसाठी लागू असेल ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
सदर योजनेची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे-
- ही योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
- जेणेकरून राज्यातील सर्व वरिष्ठ नागरिकांना तसेच गरीब वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल. तसेच राज्यातील 65 ते 75 वर्ष वयोगटातील नागरिकांना बस सेवेमध्ये तिकीट भाड्यावर 50% सवलत देण्यात आली आहे.
- या योजनेच्या संबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी असे लिहिले होते की, महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी कडून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
- देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.. सुमारे 15 लाख जेष्ठ नागरिकांना याचा फायदा घेता येऊ शकतो.
सदर योजनेची पात्रता-
- वरिष्ठ नागरिक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- 75 वर्षांवरील वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- फक्त एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ-
- या योजनेचा लाभ फक्त राज्याच्या हद्दीमध्येच मिळणार आहे. म्हणजेच वरिष्ठ नागरिकांना राज्याच्या आत मध्ये प्रवास करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरी बसेस साठी वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवासाला निघण्या अगोदर त्यांच्याकडे असलेले ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,वाह्न परवाना या मधील कोणतेही एक दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्यासाठी सवलत मिळेल.
नोट- जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.