शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. केंद्रशासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर या योजना राबवत असतात. शासनाने अशीच एक योजना महिलांसाठी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे नाव आहे “पीएम मातृत्व वंदना योजना”. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू केली आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतंर्गत गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
1) सदर योजनेचा उद्देश-.
- आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसातही अनेक स्त्रियांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावे लागते. तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे, जेणेकरून बाळाच्या प्रस्तुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल. या उद्देशाने ही योजना अंमलात आणण्यात आली आहे.
- नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे आणि गर्भवती महिला व तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे हा ही या योजनेचा उद्देश आहे.
2) सदर योजनेच्या लाभाची रक्कम-
- या योजनेतंर्गत लाभार्थी महिलेला 5000/- रुपये दिले जातात.
- ते तिला हप्त्याने दिले जातात.
- जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000/- रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000/- रुपये दिले जातात.
3) सदर योजनेचे हप्ते-
- पहिला हप्ता: अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000/- रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
- दुसरा हप्ता: गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर 2000/- रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
- तिसरा हप्ता: बाळाच्या जन्माची नोंद आणि लसीकरणाच्या वेळी 2000/- रुपयांचा तिसरा हप्ता दिला जातो.
4) सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
- या योजनेची सुरुवात राज्यात एक जानेवारी 2017 पासून करण्यात आली आहे.
- या योजनेत केंद्र शासनाचा 60 % तर राज्य शासनाचा 40% सहभाग असणार आहे.
5) सदर योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता-
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
- ही योजना केवळ आर्थिक लाभाचे असून पहिल्या जीवित अपत्यापूर्तीच मर्यादित आहे.
- या योजनेचा लाभ एकदाच घेता येऊ शकतो.
- नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मास आल्यास त्या टप्प्या पुरताच लाभ अनुज्ञेय राहील.
- या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील
- केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरी करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
6) सदर योजनेची कागदपत्रे-
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी महिला व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.
- महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बॅंक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
- महिलेचा/ पतीचा मोबाईल क्रमांक.
- लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास जात प्रमाणपत्र.
- घरपट्टी पावती.
- विज बिल
- रेशन कार्ड
- MCP कार्ड((माता बाल संरक्षण कार्ड)
7) सदर योजनेचा अर्ज कसा करावा-
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मिळवावा लागेल.
- मातृ वंदना योजनेचा लाभ तीन टप्प्यात विभागला गेलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यास तीन टप्प्याचा लाभ घेण्यासाठी त्या त्या टप्प्यानुसार लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट wcd.nic.in वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकतात.
नोट- जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now