केंद्र सरकारच्या या नवीन मुख्य यंत्रणेमुळे काही मिनिटातच मोबाइल चोर पकडला जाईल. अथवा हरवलेला मोबाईल लगेच सापडला जाईल. मोबाईल चोरीची चिंता आता करण्याची गरज नाही. पण ही योजना कशी काम करते, याचा आपणास कसा फायदा होईल, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही यंत्रणा.
सदर योजनेची निगराणी प्रणाली-
ही यंत्रणा केंद्र सरकारने 17 मे पासून चालू केली आहे. या यंत्रणेमुळे मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोबाईल चोरांना या यंत्रणेमुळे चांगलाच धडा मिळणार आहे व त्याचबरोबर याविषयीच्या विविध प्रणाली वापराची गरज भासणार नाही. या प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील मोबाईल धारकांना त्यांचा चोरीचा मोबाईल, हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येऊ शकतो. त्याचबरोबर मोबाईल कुठे आहे, याचाही शोध लावता येऊ शकतो. CDOT काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय उपकरणे बसविण्यात येणार आहेत. या प्रणालीला CEIR असे नाव आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रात हा प्रयोग करण्यात येईल.
हरवलेला मोबाईल ब्लॉक करा आणि ट्रॅक करा-
दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार ही प्रणाली संपूर्ण देशात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. CIIR प्रणाली 17 मे पासून देशभरातील काही ठिकाणी सुरू होत आहे. सीडँकचे मुख्य कार्यपालक अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी निश्चित तारखे विषयी अधिकृत माहिती दिली नाही. त्यांनी सांगितले आहे की, प्रणाली तयार आहे. येत्या तिमाहित संपूर्ण देशात ही प्रणाली सादर करण्यात येईल. त्यामुळे ग्राहक, मोबाईल वापर करणारे मोबाईल फोन ब्लॉक किंवा ट्रेक करू शकतात. मोबाईल फोन शोधण्यासाठी पूर्वीच्याच प्रणालीत काही बदल केलेले असून, त्यात काही खास फीचर्स जोडलेले आहेत. मोबाईल उपकरणांच्या विक्रीपूर्वी IMEI-15 अंकी संख्या सांगणे केंद्र सरकारने भारतात अनिवार्य केले आहे. मोबाईल नेटवर्ककडे आता IMEI- 15 अंकी क्रमांक असेल, त्यामुळे मोबाईल चोरी झाल्यास त्या नेटवर्कला त्याची माहिती मिळेल.
सदर योजनेची मोबाईल स्क्रॅप पॉलिसी-
Apple सारखे ब्रँडही देशात दाखल झालेले आहेत. त्यांनी देशात iPhoon तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशात 120 कोटी जनतेकडे कोणता ना कोणता मोबाईल आहे. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही भारतासाठी मोठी समस्या ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजच्या दाव्यानुसार वाहन पॅलिसीच्या धरतीवर लवकरच देशात मोबाईलसाठी पण स्क्रॅप पॉलिसी येऊ शकते. हे पोर्टल तीन प्रणालीत काम करते.
- CEIR- हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या जुन्या फोनचं एक पोर्टल आहे. इथे जाऊन तुम्ही तुमचा जो फोन हरवला आहे. त्या फोनचा नंबर, तुमचं नाव, फोनची माहिती अशाप्रकारे सर्व माहिती भरू शकतात. ही माहिती भरून झाल्यानंतर ती टेलिकॉम प्रोव्हाइडेंट यंत्रणेला दिली जाते. जर एखादा फोन नंबर बदलण्याचा किंवा दुसऱ्या राज्यात फोनची माहिती लगेच मिळते.
- नो युवर मोबाईल- जर तुम्ही एखादा जुना फोन विकत घेत असाल. तर तो फोन चोरीचा आहे का ? किंवा त्या फोनचा नंबर बदललेला आहे का ? किंवा तो फोन चुकीचा कामासाठी वापरलेला आहे का ? या पोर्टलवर हे सगळे तुम्ही सेकंड हॅन्ड फोन घेताना करू शकता.
- यासाठी हे पोर्टल महत्त्वाचं ठरणार आहे. यातून आपणास कळते की एका व्यक्तीच्या नावावर किती कनेक्शन आहेत किंवा आधार कार्ड मध्ये छेडछाड करून त्या व्यक्तीने किती मोबाईल कनेक्शन घेतलेले आहेत.
नोट- जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.