महाराष्ट्र सरकारची नवीन योजना; मुलींना मिळणार 75 ह्जार रुपये । Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana Maharashtra:-  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023- 2024 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी व गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव लेक लाडकी योजना 2023 आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला  या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत केली जाईल. मुलगी वयात येईपर्यंत ही आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल. म्हणजे वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो . मुलींना सशक्त,प्रबळ, आत्मनिर्भर , महिला सक्षमीकरणाला चालना मिळवून देण्यासाठी आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी या हेतूने ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, कोणी या योजनेसाठी पात्र असेल, याची सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

सदर योजनेची आवश्यक पात्रता-

  • महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील.
  • ज्या मुलींच्या कुटुंबीयांचे रेशन कार्ड पिवळे आणि केशरी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लेक लाडकी या योजनेचा लाभ वयाच्या 18 वर्षापर्यंत दिला जाईल.

सदर योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यतेचे विवरण-

  • जन्मानंतर मुलीला (5,000)पाच हजार रुपये आर्थिक सहाय्यता दिली जाईल.
  • पहिलीत जाईल तेव्हा (4,000)चार हजार रुपये देण्यात येतील.
  • सहावीत जाईल तेव्हा (6,000)सहा हजार रुपये देण्यात येईल.
  • अकरावीत जाईल तेव्हा (8,000)आठ हजार रुपये देण्यात येतील.
  • अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये पुढील शिक्षणासाठी देण्यात येतील.

लेक लाडकी योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे-

  • पालकांचे आधार कार्ड
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • सध्याचा मोबाईल नंबर
  • बँकेच्या पासबुकची छायाप्रत  
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

                अद्याप लेक लाडकी ही योजाना राज्यात लागू केलेली नाही. ही योजाना लवकरच सरकारकडून लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट पहावी लागणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्याची वेबसाईट अथवा ऑफलाइन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईट वरती याची माहिती देण्यात येईल.ज्यामुळे या योजनेंतर्गत अर्ज करुन तुम्हाला लाभ मिळू शकेल.

नोट- जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *