बंद पडलेली अस्मिता योजना लवकरच सुरू…
महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार अस्मिता योजना महाराष्ट्र याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. राज्यात बंद पडलेली अस्मिता योजना लवकरच सुरू करण्यात येणार असून राज्यातील शाळकरी मुली, बचत गटांच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन केवळ 1 रुपयात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी योजना 2022 पर्यंत चालू होती. त्यात 5 रुपयात 8 पॅड शाळकरी मुलींना तर 24 रुपयात बचत गटांना दिले जात होते. मात्र ही योजना संपली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात येईल असे ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी समाजातील संपूर्ण घटकांचा विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी योजना राबवत असते. याच गोष्टीला अनुसरून सरकारने मुलींसाठी, महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी अस्मिता योजना सुरू केली होती. ही योजना महिलांना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी चालू करण्यात आली होती. सामान्य लोकांना परवडेल या किंमतीत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. किशोर मुली, महिला बचत गट यांच्यासाठी रोजगाराचे साधनही उपलब्ध या योजनेमुळे झाले होते. महिला बचत गट यांच्याकडून मोबाईल ॲप्लिकेशन मधून नोंदणी करून सॅनिटरी नॅपकिनची विक्री करण्यासाठी भरपूर प्रतिसाद मिळाला होता.
सदर योजनेचा उद्देश-
- ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी योजना आहे
- माफक किंमतीत शालेय विद्यार्थिनींना व महिलांनाही सॅनिटरी नॅपकिन मिळावेत या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली होती.
- ही योजना बचत गटांच्या माध्यमातून चालवली जाते.
- शाळकरी मुलींना शाळेमार्फत उपलब्ध केलेली अस्मिता कार्ड नॅपकिन खरेदी करताना बचत गटाच्या प्रतिनिधीला दाखवणे आवश्यक आहे.
सदर योजनेची वैशिष्ट्ये-
- अस्मिता योजनेंतर्गत मुलींचे शाळांमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी करून मुलींची शाळांमधली उपस्थिती वाढवणे हा शासनाचा हेतू आहे.
- अस्मिता योजनेच्या अंतर्गत अस्मिता वेब पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक अस्मिता प्रायोजक होऊ शकतील.
- या उपलब्ध झालेल्या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळवण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे.
सदर योजनेचे फायदे-
- सदर योजना ही ग्रामीण भागातील मुली आणि महिला यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. तसेच मुली आणि महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
- जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येत आहे. यामुळे अस्मिता कार्ड हे जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना दिले जात आहे.
- अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचत गटांमधील महिलांना मानधन देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेद्वारे रोजगार निर्माण होत आहे. यासाठी या महिलांना बचत गटांना अस्मिता एप्लीकेशन वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- ग्रामीण भागातील मुलींना आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटण्याची जबाबदारी महिला बचत गटांना देण्यात आली आहे.
- अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमधील किशोरवयीन मुलींची गैरहजेरी कमी करण्यासाठी व त्याचबरोबर आरोग्य शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.