जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर आताच नवीन अर्ज करा…
आज आम्ही या लेखातून PM किसान योजना 2023 साठी नोंदणी कशी करावी याची माहिती आपणा सर्वांना देणार आहोत. कृषी कामासाठी प्रोत्साहन म्हणून दरवर्षी सरकार शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये देते. परंतु अजून असे अनेक शेतकरी आहेत, की ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. तर आपण आज या लेखातून PM किसान योजना 2023 साठी नोंदणी कशी करावी, त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण PM किसान योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर CM किसान योजनेचा लाभ कसा मिळू शकतात.
1) सदर योजनेची माहिती-
या योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत 15 जून 2023 रोजी सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने अर्ज करावा याबद्दलची माहिती सादर केलेली आहे. आता शासनाने कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निवडून दिलेले आहेत. म्हणजेच जेणेकरून या योजने बद्दल शेतकरी मित्रांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या समस्या या तिन्ही विभागाकडे जाऊन दूर होतील. त्यासाठी कोणती मदत कोणाकडे मागावी यासाठी शासन निर्णय सर्वात शेवटी सादर केलेला आहे. तेथे सर्व माहिती आपणास उपलब्ध आहे.
2) सदर योजनेच्या अटी-
- केंद्र शासनाच्या पोर्टलवर अर्जदाराने स्वयं नोंदणी करणे गरजेचे आहे किंवा अर्जदार तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत किंवा सामूहिक सुविधा केंद्र पोर्टलवर नोंदणी करू शकता.
- अर्जदाराला ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
- आधार क्रमांकशी बँक खाते लिंक करणे अर्जदाराला आवश्यक आहे.
- त्याचबरोबर शासन ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
3) सदर योजनेची कागदपत्रे-
- आधार कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- फेरफार
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
नोट- या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी https://pmkisan.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.