SBI स्त्री शक्ती योजना 2023

आज आपण या लेखातून महिलांसाठी खुशखबरी घेऊन आलेलो आहोत. देशातील महिला उद्योजकांमध्ये वाढ झालेली आहे. विविध बँका आणि वित्तीय संस्थेमधून महिलांना आर्थिक सहाय्य मिळवता येऊ शकते. असाच एक उपक्रम केंद्र सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचा आर्थिक स्थळ सुधारण्यासाठी व त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने SBI स्त्री शक्ती योजना हा उपक्रम सुरू केला आहे.

1) सदर योजनेची माहिती-

 या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून अत्यंत कमी व्याज दरात महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्या महिलांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, त्या सर्व महिला कर्ज घेऊ शकतात. या योजनेमुळे महिलांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही व तसेच त्या स्वतःचा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतील. काही वेळा असे आढळून आले आहे की, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. पण पैशा अभावी त्यांना तो सुरू करता येत नाही. अशा महिलांना या योजनेतंर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया कडे अर्ज करून कर्ज मिळू शकते. या योजनेतंर्गत महिलांना 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज अतिशय कमी व्याज दराने मिळू शकते. ज्या महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे व ज्या महिलांना उद्योजक बनायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूप फायद्याची ठरणार आहे.

2) सदर योजनेचे उद्दिष्टे-

  • या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वालंबी बनवणे व त्याचबरोबर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून समाजातील महिलांचा आर्थिक स्तर सुधारेल, तसेच महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल व कर्ज मिळाल्यामुळे त्यांची स्वप्न ही पूर्ण होतील.
  • फक्त कागदावर महिलांना समान दर्जा आहे, पण प्रत्यक्षात तसे काही नाही. ही पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने सदर योजना सुरू करण्यात आली आहे.

3) सदर योजनेची अट-

  • ज्या महिला उद्योजक आहेत किंवा खाजगी लिमिटेड कंपनीच्या भागीदार आहेत, संचालक किंवा सहकारी संस्थेच्या सदस्य आहेत, त्यांचे शेअर ५१% पेक्षा कमी नाही अशा महिला या व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकतात.
  • कर्ज घेणाऱ्या महिलेची त्या व्यवसायात किमान 50% मालकी असणे आवश्यक आहे.

4) सदर योजनेत समाविष्ट असलेले व्यवसाय-

  • कपडा क्षेत्र-ज्या महिला रेडिमेड कपड्यांच्या उत्पादनात काम करतात त्यांना या योजनेंतर्गत अर्ज करून कर्ज घेता येऊ शकते.
  • दुग्धव्यवसाय क्षेत्र-ज्या महिला दूध, अंडी, दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करत असतील. त्यांना या योजनेंतर्गत कर्ज मिळू शकते.
  • शेती उत्पादने-शेतीसाठी उपयुक्त पडणाऱ्या उत्पादनांचा व्यवहार करणाऱ्या महिलांना या योजनेंतर्गत अर्ज करून कर्ज मिळू शकते.
  • घरगुती उत्पादने-अनब्रँडेड आणि डिटर्जंटचा व्यवहार करणाऱ्या महिलांना ही कर्ज मिळू शकते.
  • कुटीर उद्योग- मसाले, पापड, अगरबत्ती इत्यादी सारख्या कुटीर उद्योगाशी संबंधित महिलांना अर्ज करून कर्ज मिळू शकते.

5) सदर योजनेंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम-

  • या योजनेंतर्गत मुदत कर्ज किंवा खेळत्या भांडवलाच्या स्वरूपात कर्ज दिले जाते.
  • कर्जाचे प्रमाण कर्जदार प्रोफाइल आणि खालील मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असते.
  • किरकोळ व्यापारी: रू. 50 हजार ते रू. 2 लाख
  • व्यवसाय उपक्रम: 50  हजार ते 2 लाख
  • व्यावसायिक: रु. 50 हजार ते रू. 25 लाख
  • SSI : रू. 50 हजार ते रू. 25 लाख

6) सदर योजनेचे वैशिष्ट्ये –

  • SBI या योजनेंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
  • या योजनेंतर्गत पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते.
  • हे कर्ज वेगवेगळ्या श्रेणीमध्ये लागू असल्यास मार्जिन 5% वरून कमी करता येऊ शकते.
  • जर एखाद्या महिलेने या योजनेंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर्ज घेतले तर त्यासाठी महिलेला 0.5% कमी व्याज द्यावे लागेल.
  • जर कर्जाची रक्कम ही 5 लाख रुपये असेल, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही.
  • खेळते भांडवल सुविधेसाठी सवलतीच्या मार्जिनसाठी व्याजदर 4% प्रतिवर्ष ठेवण्यात आलेले आहे.
  • MSME  मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजार रुपये ते 25 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय या योजनेंतर्गत दिले जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात लघु उद्योग करणाऱ्या महिलांना आपला व्यवसाय मोठा करता येऊ शकेल.

7) सदर योजनेची पात्रता-

  • व्यवसाय कर्ज  मिळवण्यासाठी ती महिला मूळची भारतीय असणे आवश्यक आहे.
  • ज्या महिला किरकोळ व्यवसाय करत असतील, तसेच छोट्या व्यवसाय युनिटसाठी देखील ही कर्ज सेवा प्रदान करण्यात आलेली आहे.
  • या योजनेत फक्त महिलाच अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
  • डॉक्टर, सीए, वास्तुविशारद यांसारख्या छोट्या नोकरदार सेवांमध्ये काम करणाऱ्या महिलाही या योजनेंतर्गत कर्ज मिळण्यास पात्र असेल.

8) सदर योजनेची कागदपत्रे-

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पादन प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • कंपनी मालकीचे प्रमाणपत्र
  • अर्ज
  • बँक स्टेटमेंट कंपनीमध्ये भागीदार असल्यास, त्याची आवश्यक कागदपत्रे
  • मागील 2 वर्षाचा ITR
  • पुराव्यासह व्यवसाय योजना नफा आणि तोटा विवरण

9) सदर योजनेचा निष्कर्ष-

  • कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी. एक निरोगी क्रेडिट स्कोर असल्याची खात्री करा. कारण ते कमी व्याजदर आणि सद्भावना मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *