1) सदर योजनेची माहिती-
- आज आम्ही तुमच्यासाठी अजून एक योजना घेऊन आलेलो आहोत. या योजनेचा गरीब कुटुंबीयांना खूप फायदा होणार आहे. तिचे नाव आहे “प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना”.
- या योजनेच्या मार्फत देशातील गरीब कुटुंबीयांच्या घरातील आजारी लोकांच्या आजारपणावर उपचार करता येतील.प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरीब कुटुंबीयांना स्वास्थ विमा उपलब्ध करून दिला जातो. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यावर पाच लाखापर्यंत मोफत उपचार केला जातो.
- आपल्या देशातील अनेक लोकांच्या घरची परिस्थिती ही खराब असते. त्यामुळे त्यांना उपचार घेता येत नाही. त्यामुळे ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीला गमावून बसतात. पण आता असं नाही होणार प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात मोफत उपचारासाठीच केली आहे.
- या योजनेद्वारे हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज केला जाईल. या योजनेमुळे कोणतेच गरीब कुटुंब आपल्या परिवारातील लोकांना पैशाचा अभावी गमाऊ शकणार नाही. या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात पाहायला मिळेल तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
2) सदर योजनेचा मुख्य उद्देश-
सदर योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, जेव्हा गरीब कुटुंबातील व्यक्ती आजारी होतो. तेव्हा त्याच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. म्हणून ते आपल्या आजारपणाचा उपचार करु शकत नाही.
3) सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
- ही योजना भारत सरकारद्वारे आरोग्य आर्थिक सहाय्य देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी योजना आहे.
- ही योजना भारतातील सार्वजनिक आणि खाजगी सूचीबद्ध रुग्णालयात दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारांसाठी प्रति कूटुंब प्रति वर्षी 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या योजनेतंर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर आणि 15 दिवसाच्या वैद्यकीय उपचारानंतर आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध दिली जातात.
- या योजनेतंर्गत कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.
- अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थिती आणि गंभीर आजारांचा समावेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत केला जातो.
- लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी सूचीबद्ध रुग्णालयात या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- प्रक्रिया आणि पॅकेजेस या योजनेमध्ये सुमारे 1,393 समाविष्ट आहेत. जसे की, औषधे पुरवठा, निदान सेवा, डॉक्टर्स फी, रुम फी, O-T आणि I-C-U फी इत्यादी मोफत उपलब्ध आहेत.
4) सदर योजनेचा लाभ-
- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत रुपये 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा देणारी एकमेव योजना आहे.
- या योजनेमध्ये खालील उपचार सेवा मोफत केल्या जातात.
- वैद्यकीय तपासणी उपचार
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च
- औषधे आणि वैद्यकीय वस्तू
- क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
- वैद्यकीय आरोग्य सेवा
- रुग्णालयात मुक्काम
- रुग्णालयात अन्न खर्च
- उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंती
- रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत आरोग्य सेवा
5) सदर योजनेचे ग्रामीण लाभार्थी-
- ज्या कुटुंबाचे घर फक्त एक खोली आहे आणि त्याच्या भिंती कच्च्या व छत आहे.
- ज्या कुटुंबात 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही.
- ज्या कुटुंबात अक्षम सदस्य आणि सक्षम शरीर नसलेला प्रौढ सदस्य आहे.
- SC/ST घरे.
- भूमिहीन कुटुंबे ज्यांना त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अंगमेहनतीतून मिळतो.
6) सदर योजनेचे शहरी लाभार्थी-
- शहरी भागासाठी खालील व्यावसायिक श्रेणीतील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत.
- कचरा उचलणारे.
- भिक मागून उदरनिर्वाह करणारे.
- घरगुती कामगार
- रस्त्यावरील विक्रेते/चर्मकार/फेरीवाले इत्यादी.
- बांधकाम कामगार/प्लंबर/मजदूर/पेंटर/वेल्डर/सुरक्षा रक्षक/कुली आणि इतर हेड लोडर
- सफाई कामगार/सफाई कर्मचारी/माळी
- वाहतूक कर्मचारी/वाहन चालक/वाहक चालक/वाहक सहाय्यक/गाडी ओढणारा/रिक्षाचालक.
- दुकानातील कामगार/सहाय्यक/छोट्या संस्थांमधील शिपाई/मदतनीस
- परिचर/वेटर
- इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/असेंबलर/दुरुस्ती कामगार
- धोबी/पहारेकरी
7) सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- फोटो
- मोबाईल क्रमांक
टीप-
- सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे आहे.
- ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येतो.
- या www.pmjay.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करु शकतो.
WhatsApp Group
Join Now