प्रधानमंत्री घरकुल आवास योजना

आज आपण या लेखातून घरकुल योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या देशाचे सरकार हे सतत आपल्या देशातील राहणाऱ्या लोकांचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर ते लोकांचे राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते.

          अशा प्रकारे सरकार गरीब लोकांसाठी वेगवेगळ्या घरकुल योजना राबवत आह्रे. या योजनेमध्ये जे लोक ग्रामीण भागातील चांगल्या आणि सुव्यवस्थित घरात राहत नाहीत किंवा ज्यांना घरे नाहीत अशा लोकांना घरे दिली जातात. तसेच अनेक लोक शहरांमध्ये झोपडपट्टी किंवा फुटपाथ वर राहतात अशा लोकांना या योजनेच्या मार्फत चांगल्या सुविधा असलेली घरे पुरवली जातात. गरीब आणि झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना घरे पुरवण्यासाठी सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आणि संजय गांधी आवास योजना. चला तर आपण जाणून घेऊया या योजना कशा काम करतात आणि या योजनेतंर्गत गरजू लोकांना घरे कशी पुरवली जातात. ते आपण खालील लेखात पाहूया. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. ही योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली आहे.

1) सदर योजनेचे फायदे-

  • राज्य सरकार लाभार्थ्यांसाठी परवडणारी घरे बांधतील. त्यामुळे देशाचा खाजगी किंवा सार्वजनिक विकास होण्यास मदत होईल.
  • जे लोक या योजनेसाठी पात्र असतील त्यांना राहण्यासाठी चांगली घरे मिळतील.
  • जे लोक आपली घरे सुधारण्यास पात्र असतील अशा लोकांना एक लाख रुपयांचा निधी पुरवला जाईल.
  • झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना योग्य सुविधा असणारी उत्तम घरे पुरवले जातील.
  • सध्याचे घर पुन्हा बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून दीड लाख रुपयापर्यंत निधी पुरवला जातो.

2) सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेतंर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत अर्जदाराकडे कोणतेही घर किंवा मालमत्ता नसावी, अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला घर किंवा मालमत्ता देखील असू नये.
  • इतर कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा अर्जदार लाभ घेत नसावा.
  • लाभार्थी पती-पत्नी आणि अविवाहित मुली /मुलगा असू शकतात.
  • कोणत्याही प्रौढ व्यक्तीला त्याच्या/तिच्या वैवाहिक स्थितीकडे दुर्लक्ष करून त्याला पूर्णपणे एक वेगळे कुटुंब मानले जाऊ शकते.

3) सदर योजनेत किती सबसिडी मिळेल-

  व्याज अनुदानाच्या निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) गणनेसाठी सवलत दर हा खालील सर्वांसाठी 9.00% राहील.

      श्रेणी      EWS       LIG      MIGI      MIGII
एकूण घरगुती उत्पन्न   3 लाखांपर्यंत    3-6 लाख    6-12 लाख   12-18 लाख
कर्जाची कमाल मुदत     20 वर्ष     20 वर्ष     20 वर्ष     20 वर्ष
कमाल निवास युनिट कार्पेट क्षेत्र    30 चौ.मी.    60 चौ.मी.    160 चौ.मी.   200 चौ.मी.
कर्जाची कमाल रक्कम     6 लाख     6 लाख    6 लाख    12 लाख
सबसिडी    6.50%     6.50%    4.00%    3.00%
कमाल व्याज अनुदान रक्कम    2,67,280 रु   2,67,280 रु   2,35,068 रु   2,30,156 रु

4) सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड.
  • तुमच्याकडे पक्के घर नाही असे प्रतिज्ञापत्र.
  • स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक.
  • उत्पादनाचा दाखला.
  • बँक खाते पासबुक.
  • फोटो.
  • मोबाईल नंबर.

5) सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतो.
  • ऑफलाइन अर्जासाठी अर्जदाराला त्याच्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागेल. तो भारतीय असल्याची ओळ्ख ग्रामसभा करते. त्यासाठी पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी दरवर्षी ग्रामसभेमार्फत जारी केली जाते.
  • आधिक महितीसाठी https://pmayg.nic.in/  या संकेत स्थळाला भेट द्या.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *