योजनेची माहिती-
आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने नवीन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. तिचे नाव आहे “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून रु.6,000/- वार्षिक दिले जात होते, परंतु आता या नवीन योजनेमुळे रु.12,000/- मिळणार आहे.
योजनेचे विवरण-
यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी रु.6,000/- इतकी आर्थिक मदत दिली जात होती. दर चार महिन्याचा अंतराने रु.2,000/- चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात होता. परंतु आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या रु.6,000/- मध्ये आणखी रु.6,000/- ची भर घालणार आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी रु.12,000/- मिळणार आहे.
योजनेचा लाभ-
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ पीएम किसन सन्माननिधी योजनेचे जे लाभार्थी आहेत, त्यांनाही मिळणार आहे.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे.
योजनेचे वितरण-
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पीएम सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता एकत्रित दिला जाईल.
योजनेच्या अटी-
- पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.
- अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्यावत करणे आवश्यक आहे.
- ई – केवायसी करणे आवश्यक आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.