आज आपण सदर लेखातून वातावरणाच्या होणाऱ्या बदलाची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यात कोकण आणि किनारपट्टीवरील परिसरात खूप जास्त उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथील लोक त्रस्त झाले आहेत. तसेच सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्वेकडील भागांसह मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे आता मुंबई सह कोकण परिसरात देखील उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिणव पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये विजानसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा-
आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज तारीख 17 आणि उद्या तारीख 18 पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात किती वाढ झाली आहे-
काही जिल्हांमध्ये तापमानाचा पारा 40 पेक्षा अधिक वरती सरकलेला पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये मालेगाव या ठिकाणी उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे. म्हणजेच 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे, धुळे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, वाशीम या जिल्ह्या मधला पारा 40 पार पोहोचला आहे. मंगळवारी फक्त मालेगाव या ठिकाणी तापमान 40 हुन अधिक होते. परंतु गेल्या 24 तासात जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झालेली नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाऊस असे संमिश्र वातावरण राज्यात निर्माण झाले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.