LIC नवीन जीवन शांती योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा, आयुष्यभर मिळवा 50,000/- रुपये पेन्शन

आज आपण LIC च्या नवीन योजनेची माहिती या लेखातून पाहणार आहोत. LIC ही देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती विश्वास पात्र आहे. ती आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम योजना आणत असते. त्यातीलच सेवानिवृत्ती योजना ही खूप प्रसिद्ध आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यातीलच एक म्हणजे नवीन जीवन शांती योजना ही आहे.

सदर योजनेची माहिती-

     ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी 50,000/- रुपये एवढी पेन्शन मिळण्यास मदत होते. आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सगळेजण आपल्या कमाईतून काही पैसे वाचवत असतात व ते अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न असतो, की त्याचा फायदा निवृत्तीनंतर घेता येऊ शकतो. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्हाला LIC ची नवीन जीवन शांती योजना फायद्याची ठरू शकते. जर या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते.

    कंपनीने ही योजना खरेदी करण्यासाठी कंपनीने दोन पर्याय दिले आहेत. पहिली म्हणजे एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी व दुसरी म्हणजे संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी असे दोन भाग आहेत. तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही एकत्रित पर्याय देखील निवडू शकता. ही एक वार्षिक योजना आहे. निवृत्तीनंतर आयुष्यभर नक्कीच पेन्शन  मिळत राहील.

     या योजनेत कंपनी उत्कृष्ट व्याज देते आणि योजनेनुसार, जर 55 वर्षांच्या व्यक्तीने हा प्लॅन घेताना 11 लाख रुपये जमा केले आणि ते 5 वर्षांसाठी ठेवले, तर या एकरकमी गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 1,01,880 रुपये मिळतील. मासिक आधारावर तुम्हाला 8,149 रुपये मिळतील. तर 6 महिन्यांच्या आधारावर, तुम्हाला 49,911 रुपये मिळतील.

सदर योजनेची वयोमर्यादा-

LIC च्या या पॉलिसीसाठी वयोमर्यादा 30 ते 79 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, परंतु या योजनेत कोणतेही जोखीम कवच नाही. परंतु फक्त या योजनेत उपलब्ध असलेल्या फायद्यांमुळे ही लोकप्रिय झालेली आहे.

नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *