पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. त्यासाठी कुटुंब या योजनेचे घटक आहेत. परंतु पीएम किसान योजनेचा निधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येतो. तसेच योजनेच्या अटी व शर्ती निकषानुसार काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र देखील आहेत.
या योजनेसाठी नोकरदार वर्ग म्हणजेच डॉक्टर, इंजिनियर, वकील, सनद, लेखपाल, वास्तुतज्ञ व कोणत्याही व्यावसायिक प्रकारचे काम करणारी व्यक्ती अपात्र आहे. जे शेतकरी करदाते आहेत म्हणजेच ज्यांनी मागील वर्षी कर भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जे शेतकरी व्यवसाय व नोकरी करतात त्याचबरोबर करदाते आहेत, हे शेतकरी योजनेसाठी अपात्र आहेत. जे शेतकरी निवृत्ती वेतनधारक आहेत म्हणजे शासकीय निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना दरमहा 10 हजारांवरून अधिक निवृत्तीवेतन मिळत असेल तर अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे संस्थात्मक जमीन म्हणजे शेतकऱ्यांची शेतजमीन कोणत्याही संस्थेच्या नावावर असेल तर असे शेतकरी देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. फक्त स्वतःच्या नावावर जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. वरिष्ठ अधिकारी व राजकारणी व्यक्ती म्हणजेच राष्ट्रपती, राज्यपाल, खासदार, आमदार, मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत समिती अध्यक्ष इ. पदांवर असतील अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.
सदर योजनेचा बाबतीतील या चुका टाळा-
- शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. जर ई-केवायसी केली नाही तर 19व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
- त्याचबरोबर आधार नंबर बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे.
- काही वेळेस चुकून अर्ज करताना शेतकऱ्यांकडून चुकीचं नाव, बँक खाते क्रमांक व आधार नंबर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना या गोष्टीची खात्री करावी.
- तसेच जर जमिनीच्या कागदपत्रातील त्रुटी देखील दूर कराव्यात.
पीएम किसान योजनेचे स्टेट्स कसे पहावे-
- पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर व कॅप्चा कोड टाकावा.
- नंतर Get OTP वर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलनंबरवर जो ओटीपी येईल तो टाकावा.
- त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे मागील तपशील पाहता येतील.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.